जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
पाकिस्तानातील साखर आयातीविरोधात राष्ट्रवादी आणि मनसे आक्रमक झालेली असताना शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनीही साखर आयातीवर टीका केली आहे. पाकिस्तानी खेळाडू, कलाकार चालत नाही मग साखर कशी चालते असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
शेतकरी आत्महत्या आणि विविध प्रश्नांवर शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सांगली मध्ये रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात जेलभर आंदोलन केलं. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. सुमारे ३० जणांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सरकारकडून शेतीमालावरील निर्बध उठवण्यात यावेत, शेतीमालाला हमीभाव मिळावा अश्या अनेक मागण्या करण्यात आल्यात जर सरकारने येत्या काळात सकारात्मक पाऊल उचलले नाही तर यापुढील काळात आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही रघुनाथदादा पाटील यांनी दिला.