“देशाचा चौकीदारच निघाला चोर” – राहुल गांधींचा हल्लाबोल

राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी स्वतःच मोदी चोर असल्याचं म्हंटलंय असा आरोप राहुल गांधींनी केलाय. अनिल अंबानींच्या कंपनीला मोदींनीच कंत्राट मिळवून दिल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला. संयुक्त संसदीय समितीकडून याप्रकरणी चौकशीची मागणीही राहुल यांनी केली.  भारताच्या जवानांच्या आयुष्याचा, देशाच्या […]

“देशाचा चौकीदारच निघाला चोर” – राहुल गांधींचा हल्लाबोल

राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी स्वतःच मोदी चोर असल्याचं म्हंटलंय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

अनिल अंबानींच्या कंपनीला मोदींनीच कंत्राट मिळवून दिल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला. संयुक्त संसदीय समितीकडून याप्रकरणी चौकशीची मागणीही राहुल यांनी केली.  भारताच्या जवानांच्या आयुष्याचा, देशाच्या सुरक्षेचा आणि भ्रष्टाचाराचा हा प्रश्न आहे. मोदी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेससह सर्व मुख्य विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधत आहेत.

राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरण

फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या खुलाशानंतर खळबळ उडालीय. त्यांच्या दाव्यानंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

भारत सरकारनं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी व्यवहार करण्याची शिफारस केली होती, असा दावा ओलांद यांनी केला होता. त्यावर आता सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी काँग्रेसनं केली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number