सरकारने मोठ्या व्यक्तींची नावे वापरण्याचा धंदा बंद करावा; राधाकृष्ण विखे-पाटलांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सरकार गोंधळलेलं, ऐतिहासिक कर्जमाफी कशी? असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी सरकारला केला.   तसेच सरकारने सांगितलेला 31 लाख शेतकऱ्यांचा आकडा फसवा असल्याचंही ते म्हणालेत. कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला.   सराकरच्या अनेक योजना आहे. मात्र, त्याबद्दल कोणाताही खुलासा सरकार करत नाही. त्यामुळे चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे […]

सरकारने मोठ्या व्यक्तींची नावे वापरण्याचा धंदा बंद करावा; राधाकृष्ण विखे-पाटलांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकार गोंधळलेलं, ऐतिहासिक कर्जमाफी कशी? असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी सरकारला केला.

 

तसेच सरकारने सांगितलेला 31 लाख शेतकऱ्यांचा आकडा फसवा असल्याचंही ते म्हणालेत. कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटलांनी

केला.

 

सराकरच्या अनेक योजना आहे. मात्र, त्याबद्दल कोणाताही खुलासा सरकार करत नाही. त्यामुळे चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले

आहेत.

 

शिवसेनेला मलिष्कासारखं कोणी काही बोललं की ते नाराज होतात. पालिका अधिकारी ज्या तत्परतेने मलिष्काच्या घरी गेले त्याच तत्परतेने त्यांनी मातोश्रीवरही जायला

पाहिजे.

 

मग पालिकेवर भरोसा आहे का? याचे उत्तर सेनेला मिळाले असते. अशा शब्दात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सेनेवर निशाणा साधला.

 

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने सरकारची विश्वासार्हता पणाला लागली होती. आता कोणी वाचवू शकणार नाही असे वाटत असल्याने सरकारने शेवटी छत्रपती शिवाजी

महाराजांचे नाव वापरले.

 

पण, सरकारने मोठ्या व्यक्तींची नावे वापरण्याचा धंदा बंद करावा अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number