जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
यवतमाळमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचे बळी जाऊ लागले आहेत. या विषवाधेमुळे आतापर्यंत 18 शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. याबाबत चौकशीसाठी राज्य सरकारने विषेश पथकाची (एसआयटी) स्थपना करावी, आणि त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे.
विखे पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवले. राज्याचे कृषी आयुक्त, विभागीय कृषी संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सांना तातडीने निलंबीत करावे, त्याचबरोबर संबंधित औषधी कंपन्यांविरुध्द सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे आणि पीडीत शेतकरी कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विखे पाटलांनी यावेळी मुख्यमंत्र्याकडे केली.