जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘राधा’ या मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून ही मादी बिबट्या आजारी होती. तर, दुसरीकडे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावामध्ये 50 फूट खोल असलेल्या विहिरीत पडून बिबट्याचा
मृत्यू झाला. विहीरीत 35 फूटांपर्यंत पाणी आणि कठडे नसल्यानं बिबट्याला बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या.