पालिका आयुक्तांवर 302चा गुन्हा दाखल करा – राधाकृष्ण विखे पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईत सुरू असणाऱ्या सगळ्या घटनांच्या सत्राला पालिका आयुक्त जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीचे आदेश आम्हाला मान्य नाहीत. पालिका आयुक्तांवर 302 चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन विखे पाटलांनी ही मागणी केली आहे. कमला मिल […]

पालिका आयुक्तांवर 302चा गुन्हा दाखल करा – राधाकृष्ण विखे पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत सुरू असणाऱ्या सगळ्या घटनांच्या सत्राला पालिका आयुक्त जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीचे आदेश आम्हाला मान्य नाहीत. पालिका आयुक्तांवर 302 चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन विखे पाटलांनी ही मागणी केली आहे.

कमला मिल दुर्घटना झाली पण, यामध्ये पालिका आयुक्त म्हणतात माझ्यावर दबाव होता. पण, परवानगी सुद्धा आयुक्तच देतात आणि कारवाई सुद्धा आयुक्तच करतात. असे करून दिशाभूल करण्याचे सध्या सुरू आहे. गेल्या एक वर्षांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झालीय. याला पालिका आयुक्त जबाबदार आहेत अशी टीकाही विखे पाटील यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number