वृत्तसंस्था, मुंबई
आर कॉम अर्थात रिलायन्स कम्युनिकेशनने जबरदस्त प्लान आणला आहे. फक्त 33 रुपयांचा हा प्लॅन आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि व्हॉईस कॉलिंग दोन्हीही मिळणार आहे. वेगवेगळ्या सर्कलमध्ये या प्लॅनची किंमत वेगवेगळी असू शकते.
या प्लॅनमध्ये 1GB डेटासोबत कोणत्याही नेटवर्कवर एका तासासाठी व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे. दोन दिवसांसाठी हा प्लॅन असेल. कंपनीने 2G ग्राहकांना 4G मध्ये अपग्रेड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा ग्राहकांना सेवेचा लाभ मिळणार नाही.
यापूर्वीही कंपनीने 147 आणि 193 रुपयांचा प्लॅन आणला होता. 147 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा मिळणार आहे.