आरोग्य तपासणीसाठी वारकरी भक्तांच्या रांगा

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. अशाच रांगा सध्या पंढरपुरात वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता येथेही दिसत आहेत. या रांगा विठ्ठल दर्शनासाठी नसून शासनाच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठी आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ लाख भाविकांची आरोग्य तपासणी झाली आहे. आरोग्य विभागाकडून पंढरपुरात तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या […]

आरोग्य तपासणीसाठी वारकरी भक्तांच्या रांगा

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. अशाच रांगा सध्या पंढरपुरात वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता येथेही दिसत आहेत. या रांगा विठ्ठल दर्शनासाठी नसून शासनाच्या महाआरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी करण्यासाठी आहेत. यामध्ये आतापर्यंत ७ लाख भाविकांची आरोग्य तपासणी झाली आहे.

आरोग्य विभागाकडून पंढरपुरात तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या. एकूण पस्तीस प्रकारच्या तपासण्या येथे होत आहेत. रक्त तपासणी, नेत्र तपासणी ते सोनोग्राफीपर्यंतची सर्व व्यवस्था रुग्णांसाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शिबिरामध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत स्वतः जातीने लक्ष देऊन आहेत. या शिबिरासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि आरोग्यदूत असे एकूण नऊ हजार लोक वारकरी भक्तांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. या शिबिरामध्ये तपासणी झाल्यानंतर औषधोपचार मिळत आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील सर्व उपचार आणि शास्त्रक्रिया प्रत्येक भाविकाला आपापल्या गावात मोफत मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number