जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
परळमधल्या 17 मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर आग लागली. या आगीत 4 जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. तर 14 जण आगीत जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहे
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या आगीचे कारण काय? यावर ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीने प्रश्न उपस्थित केले आहेत.