जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
महाराष्टातील प्रसिध्द याञा म्हणुन ओळख असलेल्या पुसेगांवच्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव उत्साहात पार पडला. यात्रेचा आज मुख्य दिवस असुन सेवागिरी महाराजांच्या निघणारया रथावर नवसपुर्ती म्हणुन भाविक पैशाचा नोटा अर्पण करतात.
खटाव तालुक्यातील पुसेगांव येथील श्री सेवागिरी महाराजाच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्ताने रथोत्सव साजरा केला गेला.
भाविकाच्या मनोकामना पुर्ण होतात अशी भावना लोकाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुमारे पाच ते सात लाख भाविक याञा काळात सेवागिरी महाराजाच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतात.
सेवागिरी महाराजांच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून भाविक मोठी गर्दी करतात सातारा जिल्ह्यात सेवागिरी यात्रेची मोठी ओळख असून दुष्कांळी भागातील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात.