जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
बस आणि कारमध्ये झालेल्या अपघातात ठाण्यातील काँग्रेस माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद-गंगापूर रोडवर रविवारी बस आणि कारचा अपघात झाला होता.
या अपघात काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय चौपानं यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबादमधील इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याहून मुंबईकडे येताना हा अपघात झाला होता.