पंजाबमधील तीन कुख्यात शार्पशूटरर्संना कल्याणमधील मोहने परिसरात अटक करण्यात आली आहे. पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खड़कपाड़ा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तिघांना ताब्यात घेतले आहे. शिवम सिंग, गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार हे तिघे पंजाबमधील खत्री गँगचे सदस्य असून, पंजाबमधील मख्खन सिंग यांची हत्या करून ते कल्याणजवळील मोहने परिसरात लपून बसले होते.
कल्याण पश्चिम येथे मोहने यादव नगर परिसरातील एका इमारतीत पंजाब मधील कुख्यात गुंड लपून बसल्याची माहिती पंजाब पोलिसांकडे होती . गेल्या दोन दिवसांपासून पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे अधिकारी कर्मचारी या परिसरावर नजर ठेवून होते. आज पहाटे चारच्या सुमारास पंजाब अँटी गँगस्टर टास्क फोर्स, मुंबई एटीएस आणि खडकपाडा पोलिसांच्या मदतीने इमारतीत लपून बसलेल्या तीन शार्प शूटर्सना ताब्यात घेण्यात आले. शंभरहून जास्त पोलीस कारवाईसाठी तैनात करण्यात आले होते.
या हत्याकांडात पंजाब पोलिसांनी मनदीप सिंग या आरोपीला अटक केली होती. या आरोपींच्या चौकशी दरम्यान शिवम सिंग,गुरुमुख सिंग, अमनदिप कुमार या तिघांची नावे पुढे आली. या तिघांची कसून चौकशी पुढे पंजाब पोलीस करणार आहेत.
अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
