‘पंजाब मुख्यमंत्र्यांचे वागणे निराशाजनक’ – जे.पी. नड्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली आहे. यावर भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचे वागणे निराशाजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे काही प्रकरण घडले आहे, त्याप्रकरणात मुख्यमंत्री चन्नी […]

‘पंजाब मुख्यमंत्र्यांचे वागणे निराशाजनक’ – जे.पी. नड्डा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली आहे. यावर भाजप नेते जे.पी. नड्डा यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांचे वागणे निराशाजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जे काही प्रकरण घडले आहे, त्याप्रकरणात मुख्यमंत्री चन्नी यांनी हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. आंदोलनकर्त्यांना पंतप्रधान मोदींच्या नियोजित दौऱ्याच्या रस्त्यावर जाणीवपूर्वक जाऊ दिले गेले आणि दुसरीकडे मोकळा असल्याचा निरोप दिला गेला. त्यामुळे पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांचे हे वागणे आक्षेपार्ह असल्याचे जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस, पंतप्रधानांची किती घृणा करते हे यातून दिसत आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेचे काही प्रोटोकॉल असतात, ते का पाळले गेले नोही, असा प्रश्नसुद्धा स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number