एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम

पुणे, २८ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी:  सवलतीचा लाभ घेत पुणेकरांनी रविवार सुट्टीचा दिवस मेट्रोमधून प्रवास करत साजरा केला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. सुरुवातीला मेट्रोबाबत पुणेकरांचा निरुत्साह दिसून येत होता. अनेक मेट्रो रिकाम्याच धावताना दिसत होत्या. मात्र १ ऑगस्ट २०२३ पासून पुण्यात मेट्रो-२ चे लोकार्पण झाले आणि […]

एकाच दिवसात पुणेकरांचा मेट्रोतून प्रवासाचा विक्रम

पुणे, २८ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी:  सवलतीचा लाभ घेत पुणेकरांनी रविवार सुट्टीचा दिवस मेट्रोमधून प्रवास करत साजरा केला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. सुरुवातीला मेट्रोबाबत पुणेकरांचा निरुत्साह दिसून येत होता. अनेक मेट्रो रिकाम्याच धावताना दिसत होत्या. मात्र १ ऑगस्ट २०२३ पासून पुण्यात मेट्रो-२ चे लोकार्पण झाले आणि नागरिकांना सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले.

पुणेकर आता मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. पुणे मेट्रोकडून शनिवार आणि रविवारी प्रवाशांना तिकीट दरात सवलत दिली जात असल्यानेया दोन दिवशी मेट्रोमध्ये प्रवाशांची चांगली गर्दी होत आहे. आता रविवारी पुणेकरांनी मेट्रोमधून प्रवासाचा विक्रम केला आहे. सवलतीचा लाभ घेत पुणेकरांनी रविवार सुट्टीचा दिवस मेट्रोमधून प्रवास करत साजरा केला आहे.

रविवारी एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ लोकांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. यातून मेट्रोला १ कोटींचे महसूल मिळाले आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर, वनाज व रुबी हॉल मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत होती. मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवार आणि रविवारी तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे या दोन दिवसात प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढत असते. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिकीट दरात कायमस्वरुपी ३० टक्के सवलत दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number