अगरवाल दांपत्य आणि इतर चौघांचे जामीन फेटाळले
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याआधी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन फेटाळण्यात आले
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याआधी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी फेटाळले. सध्या सर्व आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
'या' सहा जणांचे जामीन फेटाळले
- अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल
- अल्पवयीन आरोपीची आई शिवानी विशाल अगरवाल
- ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे
- आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर
- अशफाक मकानदार
- अमर गायकवाड