पुण्यातील दांडेकर पूल येथील मुठा कालव्याला भगदाड पडल्यामुळे शहराला पुराचे स्वरुप आले होते. या कालव्याच्या लगतच झोपडपट्टीतील २०० हून अधिक कुटुंबाचे संसार या पाण्याबरोबर वाहून गेल्याने येथील अनेक नागरिक बेघर झाले आहेत. ही दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली आहे. या दुर्घटनेत आईने आपल्या मुलाच्या क्लासची फी जपून ठेवलेली रक्कम पाण्यात वाहून गेल्याने पालक अक्षरश: हतबल झाले आहेत. इतके कष्ट करून जमा केलेले पैसे एका क्षणात वाहून जातील, असे कधी वाटलंही नव्हतं. कुठून आणार आता एवढी रक्कम?
एका झोपडपट्टीत राहणाऱ्या या विद्यार्थ्याचे इंजिनियर होण्याचे स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाले.
कालवा फुटल्याने जनता वसाहत आणि पर्वती या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पुरामुळे सुरेश बोडेकर यांच्या घरातील अनेक गोष्टी वाहून गेल्या आहेत. सुरेश बोडेकर यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी दीड लाख रुपयांची रक्कम आपल्या मित्राकडून घेतली होती. पण एका पुरामध्ये त्यांची ही रक्कम वाहून गेली. सुरेश बोडेकर हे मार्केटयार्ड येथे हमालीचे काम करतात. पुरात वाहून गेलेल्या या पैशांमुळे मुलांची क्लासची फी कशी भरणार? असा मोठा प्रश्न बोडेकर कुटुंबियांसमोर उभा राहीला आहे?
या बोडेकर कुटुंबियांना कोण मदतीचा हात देणार? या चिंतेत हे कुटुंबिय आहे. कशी उभी करणार एवढी मोठी रक्कम?……