Pune : पुण्यातील उंड्री सोसायटीत भीषण आग; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, नऊ जखमी

पुण्यातील उंड्री येथील मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटीत भीषण आग लागून 15 वर्षीय तर्ष खेतान याचा मृत्यू झाला आहे.

Pune : पुण्यातील उंड्री सोसायटीत भीषण आग; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, नऊ जखमी

पुणे : उंड्री परिसरातील मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटीच्या बाराव्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत एका किशोराचा दुर्दैवी मृत्यू झाला. 15 वर्षीय तर्ष कमल खेतान हा मुलगा आग लागल्यावेळी घरात एकटाच झोपला होता. त्याचे आई-वडील कामावर गेल्याने घरात कोणी नव्हते.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. काही वेळातच आगीचे ज्वाळा खिडक्यांमधून बाहेर येऊ लागल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. त्याचवेळी तर्षची आईही घटनास्थळी पोहोचली.

हेही वाचा – Mumbai News : वाहतूक कोंडीवर नवा प्रयोग;MMRDAचा एआय सॉफ्टवेअर आणि ड्रोन सर्वेक्षण 

दरम्यान, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असतानाच स्वयंपाकघरात ठेवलेले दोन गॅस सिलिंडर फुटले. या स्फोटात अग्निशमन दलाचे दोन जवान आणि सोसायटीतील नागरिकांसह एकूण नऊ जण जखमी झाले. जखमींमध्ये डॉ. मृणाल मयंक (42), योगेश जाधव (45), झिशान खान (35), सुरक्षारक्षक विनोद लिमकर (32) यांचा समावेश आहे.

 हेही वाचा – Central Railway Power Block : अनेक रेल्वेगाड्या दादरपर्यंतच धावणार! मध्य रेल्वेवरील 80 दिवसांच्या ब्लॉकमुळे बदलणार ट्रेनचं वेळापत्रक, जाणून घ्या

अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर पाच फायर इंजिन, टँकर आणि उंच शिडीच्या मदतीने आग नियंत्रणात आणली गेली. मात्र बेडरुममध्ये अडकलेला तर्ष गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. काळेपडळ पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number