पुणे महानगरपालिका हद्दीतील शाळा आजपासून सुरु

पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पहिल्या दिवशी पुण्यातील पन्नास ते साठ शाळाच सुरु होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पालकांनी त्यासाठी ईमेलच्या स्वरुपात त्यांची संमती शाळांना पाठवायची आहे. ही संमतीपत्र शाळांना महापालिकेकडे जमा करायची आहेत. त्यानंतर महापालिकेचे पथक त्या शाळेमध्ये […]

पुणे महानगरपालिका हद्दीतील शाळा आजपासून सुरु

पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पहिल्या दिवशी पुण्यातील पन्नास ते साठ शाळाच सुरु होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पालकांनी त्यासाठी ईमेलच्या स्वरुपात त्यांची संमती शाळांना पाठवायची आहे. ही संमतीपत्र शाळांना महापालिकेकडे जमा करायची आहेत. त्यानंतर महापालिकेचे पथक त्या शाळेमध्ये जाऊन त्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे का? शाळेमधे सॅनीटायझर, ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधा आणि इतर गोष्टी आहेत का? याची पडताळणी करेल. त्यानंतरच महापालिकेकडून त्या शाळेला अंतीम परवानगी देण्यात येणार आहे. मात्र पुण्यातील बहुतांश पालकांनी अशी संमतीपत्रं देण्यासाठी उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे महापालिका हद्दीतील ५२९ शाळांपैकी २५२ शाळांना महापालिकेच्या पथकाने भेट दिलीय आणि त्यापैकी पन्नास ते साठ शाळांनी आवश्यक त्या गोष्टींची पुर्तता केल्याने त्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्गच आज सुरु होणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number