जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातल्या शिरुर तालुक्यात एका कबड्डीपटू विद्यार्थ्याचा खेळादरम्यान एकाएकी मृत्यू झालाय. पिंपळे जगताप येथील नवोदय विद्यालयातील हा विद्यार्थी असल्याची माहिती समोर येतंय. गौरव वेताळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. कबड्डी खेळताना अचानक चक्कर आल्यानं तो खाली कोसळला. शाळा प्रशासनाने तातडीने त्याला शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं असून शवविच्छेदन अहवाल येणं बाकी आहे.
गौरव चांगला कबड्डीपटू होता. तो शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्तही होता. तसेच, त्याला कोणताही जुना आजार नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजू शकणार आहे.