आता अनधिकृत बांधकामांवर ‘सॅटेलाइट’चे लक्ष

जय महाराष्ट्र न्यूज,पुणे पुण्यातील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी ‘इस्रो’च्या मदतीने सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी शहराचे सूक्ष्म आणि तपशीलवार नकाशे हैदराबाद येथील सॅटेलाइट लॅबमधून मागविले आहेत. सुमारे दोन महिन्यांत नकाशांनुसार कारवाई करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. शहरात अनधिकृत बांधकामे केव्हा होतात, याची महापालिकेला माहिती मिळत नाही. त्यामुळे अंतर्गत आणि बाह्यस्वरूपी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेला […]

आता अनधिकृत बांधकामांवर ‘सॅटेलाइट’चे लक्ष

जय महाराष्ट्र न्यूज,पुणे

पुण्यातील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी ‘इस्रो’च्या मदतीने सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. त्यासाठी शहराचे सूक्ष्म आणि तपशीलवार नकाशे हैदराबाद येथील सॅटेलाइट लॅबमधून मागविले आहेत. सुमारे दोन महिन्यांत नकाशांनुसार कारवाई करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

शहरात अनधिकृत बांधकामे केव्हा होतात, याची महापालिकेला माहिती मिळत नाही. त्यामुळे अंतर्गत आणि बाह्यस्वरूपी अनधिकृत बांधकामांवर महापालिकेला नियंत्रण ठेवता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर किमान बाह्यस्वरूपाची बांधकामे रोखण्यासाठी सॅटेलाइटची मदत घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी 8 लाख 38 हजार रुपये महापालिकेने संबंधित प्रयोगशाळेत भरले आहेत. पुण्यात सध्या सुमारे 80 हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे असल्याचा अंदाज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number