जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे-नाशिक महामार्गावर गोसासी जवळ शेतकऱ्याला कंटेनरने उडविल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वामन गोरडे असे या शेतकऱ्याचे नाव
आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास वामन गोरडे पायी दूध घेऊन जात असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने त्याला धडक
दिली.
घटनास्थळावरुन पळ काढणाऱ्या चालकाचा नागरिकांनी पाठलाग केला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. संतप्त झालेल्या
नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.