जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत्यू झालेल्या योगेश जाधवाच्या परिवाराची भेट घेतलीय. नांदेडमधल्या आष्टी येथे रामदास आठवलेंनी जाधव कुटुंबाची भेट घेतलीय.
दरम्यान, पक्षातर्फे योगेश जाधवच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत आठवलेंनी जाहीर केलीय. योगेश जाधवच्या मृत्यू प्ररकरणाची न्यायालयीन चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही यावेळी आठवलेंनी सांगितलंय.
कोरेगाव-भीमा हिंसाचारादरम्यान आष्टीत दगडफेक आणि पोलीसांचा लाठीमार झाला होता. लाठीमारात 16 वर्षीय योगेश जाधवचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतंय.