पुणे : पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने कालच अलर्ट दिला होता. जोरदार पावसाचा धरतीवर पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.