Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! वर्षभरात 6 नवीन फलाटांसह ‘या’ स्थानकाचा होणार विस्तार

येत्या वर्षभरात स्थानकावर 6 नवीन फलाट (Platforms) उभारले जाणार असून, 'यार्ड रिमॉडलिंग'च्या कामालाही सुरुवात झाली आहे.

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! वर्षभरात 6 नवीन फलाटांसह ‘या’ स्थानकाचा होणार विस्तार

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि गाड्यांची संख्या विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या विस्तारीकरणाचा मोठा प्लॅन आखला आहे. येत्या वर्षभरात स्थानकावर 6 नवीन फलाट (Platforms) उभारले जाणार असून, 'यार्ड रिमॉडलिंग'च्या कामालाही सुरुवात झाली आहे. पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली.

विस्तारीकरण आणि निधीचा लेखाजोखा
पुणे रेल्वे विभागात सध्या एकूण 1,700 कोटी रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. स्थानकाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे:
नवे फलाट आणि रिमॉडलिंग: नवीन 6 फलाटांची उभारणी आणि सध्याच्या 4 फलाटांच्या विस्तारासाठी 400 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हे काम 2026-27 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
सॅटेलाईट टर्मिनल्स: खडकी आणि हडपसर स्थानकांचा टर्मिनल म्हणून विकास करण्यासाठी 200 कोटींहून अधिक निधी खर्च केला जात आहे.
अमृत भारत स्टेशन: विभागातील 20 स्थानकांचा कायापालट या योजनेअंतर्गत केला जात असून, बीड-वडवणी मार्गासह 4 नवीन स्थानकांना मंजुरी मिळाली आहे.

प्रवासी सुरक्षा आता 'हायटेक'
रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे:
सीसीटीव्ही जाळे: पुणे स्थानकावर 160 आणि विभागातील इतर स्थानकांवर 382 उच्च दर्जाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
'कवच' प्रणाली: गाड्यांच्या धडकेपासून संरक्षण देणाऱ्या 'कवच' सुरक्षा यंत्रणेचे कामही वेगाने सुरू आहे.
कारवाईचा बडगा: चोरी, अनधिकृत फेरीवाले आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष मोहिमा राबवून हजारो जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वेच्या उत्पन्नात मोठी झेप
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पुणे रेल्वे विभागाने आर्थिक आघाडीवरही चमकदार कामगिरी केली आहे:
एकूण महसूल: 2,238 कोटी रुपये (गेल्या वर्षाच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी वाढ).
प्रवासी उत्पन्न: 1,657 कोटी रुपये (13 टक्क्यांची वाढ).
तिकीट तपासणी: विनातिकीट प्रवाशांवरील कारवाईतून 30 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, यात 57.5 टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. 

हेही वाचा – Dharashiv ZP Education Drive: भोंगा वाजणार आणि टीव्ही-मोबाईल बंद होणार; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा नवीन ‘पॅटर्न’, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसराचा सर्वंकष विकास करण्यासाठीचा आराखडा तयार असून, तो अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे भविष्यात पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number