‘अल्पवयीन गुन्हेगारावर कारवाई शक्य’

पुण्यात पोर्शे कारने अपघातात दोघांना उडवले. या प्रकरणाची दखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तलयात जाऊन आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

‘अल्पवयीन गुन्हेगारावर कारवाई शक्य’

पुणे : पुण्यात अल्पवयीन मुलाने दारू पिऊन पोर्शे कार चालवली आणि दोन जणांना उडवून पळ काढला. या अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाला. पुण्यात घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तलयात जाऊन आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोर्शे कार अपघात प्रकरणाची सर्व कागदपत्रे तपासली. यानंतर पुढील कारवाईसाठी निर्देश दिले. या प्रकरणाशी संबंधित अल्पवयीन हा १७ वर्षे ८ महिन्यांचा आहे. यामुळे त्याच्या विरोधात कारवाई शक्य आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दारू पिऊन गाडी चालवणे, परवाना नसताना गाडी चालवणे, नोंदणी नसलेले वाहन रस्त्यावर आणणे आणि चालवणे, अपघात करून पळून जाणे हे गंभीर गुन्हे आहेत. या प्रकरणात कठोर कारवाई शक्य असल्याचे गृहमंत्री म्हणाले. या प्रकरणात आरोपी जरी अल्पवयीन असला तरी घडलेला गुन्हा आणि त्याचे अठरा वर्षाजवळ पोहोचलेले वय पाहता, कठोर कारवाई व्हावी अशीच पुणे पोलिसांची भूमिका आहे. पुणे पोलीस त्यांची भूमिका न्यायालयात मांडतील, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

नागरी वस्तीतल्या पब आणि बार सदंर्भात नवे धोरण आणण्याचा विचार सुरू आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे, असेही गृहमंत्री म्हणाले. अनेक पबमध्ये दारू देताना अल्पवयीन आहे की नाही हे तपासले जात नाही. या बाबीची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. पबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि दारू देण्याआधी अल्पवयीन आहे की नाही हे तपासावे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बाल न्याय हक्क मंडळाने आरोपीला जामीन दिला आहे. या निर्णयाला पुणे पोलीस आव्हान देणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपी विरोधात ३०४ चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ३०४ अ हे कलम लावलेले नाही आणि दिलासा दिलेला नाही. पोलिसांनी आरोपी प्रकरणी पक्षपात केलेला नाही, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

पोर्शे अपघातानंतर गृहमंत्री फडणवीस पुण्यात
पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात गृहमंत्र्यांची बैठक
अल्पवयीन गुन्हेगारावर कारवाई शक्य – फडणवीस 
कठोर शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्नशील – फडणवीस 
मद्यगृहांच्या आसपास गस्त वाढवणार – फडणवीस
पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या – फडणवीस 
न्यायालयाच्या भूमिकेमुळे जनसंताप वाढला – फडणवीस
पुणे पोलिसांनी कठोर कारवाईचीच मागणी केली आहे – फडणवीस 
निवासी वस्तीतील मद्यगृहांवर पाळत ठेवणार – फडणवीस 
बेकायदेशीर मद्यगृहांना टाळे ठोका – फडणवीस
फडणवीसांनी पोलिसांवरील दबावाचा आरोप फेटाळला
पुणे पोलिसांनी हत्येचे कलम लावले आहे – फडणवीस 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number