जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना सीटला असलेल्या मेटलच्या पट्टीमुळे प्रवाशाची पँट फाटलीय. प्रवाशाने पीएमपीविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली असून भरपाईची मागणी करण्यात आलीय.
पीएमपीच्या शिवाजीनगरहून जांभूळवाडीला जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशी संजय शितोळे हे कात्रजला जाण्यासाठी बिबवेवाडी स्टॉपवरून बसमध्ये बसले. या प्रवासात सीटच्या निघालेल्या मेटलच्या पट्टीने त्यांची पँट फाटली. त्यामुळे शितोळे यांनी बस कात्रज पोलीस चौकीला नेली व पीएमपीच्या प्रशासनाविरोधात तक्रार दिलीय.
बसमध्ये बसल्यानंतर पँट फाटली असल्यानं आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संजय शितोळे यांनी केलीय. प्रवाशी संजय शितोळे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पीएमपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. प्रवाशांच्या दृष्टीने असुरक्षित बस पीएमपी मार्गावर का पाठवतात?, असा प्रश्नही शितोळे यांनी यावेळी उपस्थित केलाय.