पुण्यात गाडी पार्किंग करताय? अशी असणार शुल्क आकारणी

 जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्यात गाडी पार्किंग विषय फार महत्त्वाचा ठरतोय. पुणेकरांना गाडी पार्किंगसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. यापुढे पुणे शहरात कुठेही दुचाकी किंवा चारचाकी वाहनं लावली तर त्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग पॉलिसी मंजूर केलीय.   पुणेकरांना कशाप्रकारे पैसे मोजावे लागतील : कमी गर्दीची ठिकाणे, मध्यम गर्दीची […]

पुण्यात गाडी पार्किंग करताय? अशी असणार शुल्क आकारणी

 जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यात गाडी पार्किंग विषय फार महत्त्वाचा ठरतोय. पुणेकरांना गाडी पार्किंगसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. यापुढे पुणे शहरात कुठेही दुचाकी किंवा चारचाकी वाहनं लावली तर त्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने पार्किंग पॉलिसी मंजूर केलीय.

 

पुणेकरांना कशाप्रकारे पैसे मोजावे लागतील :

कमी गर्दीची ठिकाणे, मध्यम गर्दीची ठिकाणे आणि जास्त गर्दीची ठिकाणे या 3 प्रकारांमध्ये शहरातील रस्त्यांचं वर्गीकरण केले जाणार

सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत दुचाकीसाठी प्रतितास 2 ते 4 रुपये आकारले जाणार आहेत.

कार आणि इतर खाजगी चारचाकी वाहनांसाठी 10 ते 20 रुपये मोजावे लागणार आहेत.

ऑटोरिक्षांसाठी 6 ते 12 रुपये मोजावे लागतील

मोठ्या खाजगी बसेससाठी 30 ते 60 रुपये मोजावे लागतील

रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेतही चारचाकी वाहनं रस्त्यावर लावण्यास अडीच रुपयांपासून 10 रुपयांपर्यंतचे शुल्क वाहन मालकांना भरावं लागेल

रस्त्यावर रात्री गाडी पार्क करण्यासाठी एका वर्षाची रक्कम आगाऊ घेऊन परवाना देण्याची सोयही या योजनेत करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number