जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यातील नयना पुजारी खून खटल्याचा आज निकाल देण्यात येणार आहे. गेली सात वर्षे या खटल्याची सुनावणी सुरू होती.
पुजारी खून खटल्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात हा निकाल देण्यात येणार आहे.
सुनावणी सुरू झाल्यानंतर मुख्य आरोपी योगेश राऊत ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीवर परिणाम झाला होता. गुन्हे शाखेने त्याला शिर्डीमध्ये अटक केली.