Pune Navale Bridge: पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी आता ‘हे’ नवे नियम

ओव्हरलोड वाहन तपासणी, चेकपोस्ट, स्पीडगन्स आणि ऑन-द-स्पॉट दंडाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Navale Bridge: पुण्यातील नवले ब्रिजवरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी आता ‘हे’ नवे नियम

पुण्यातील नवले पुल परिसर कायमच चर्चेत असतो तो येथील होणाऱ्या आपघातांमुळे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल अपघातांचा हॉटस्पॉट ठरला असून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. अखेर सततच्या अपघातांच्या मालिकेनंतर प्रशासनला जाग आली असून नवले ब्रिज संदर्भातील मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे.  नवले पूल परिसरातील उतार आणि वेगवान वाहतूक यामुळे येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र आता या भागातील वाहनांची वेगमर्यादा 60 वरून थेट 30 किमी प्रतितास करण्यात आली आहे. हे पाऊल उचलण्यामागे उद्दिष्ट स्पष्ट आहे, वेगावर नियंत्रण मिळवणे आणि अपघातांची तीव्रता कमी करणे. वाहनांच्या वेगावर नजर ठेवण्यासाठी स्पीडगन्सचा वापर वाढवला जाणार असून, वाहने नियमांचे उल्लंघन करत असल्यास तात्काळ कारवाई केली जाईल.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर झालेल्या बैठकीत या उपाययोजनांना हिरवा कंदील देण्यात आला. त्यांनी अवजड वाहनांविषयीही कठोर निर्णय घेतला आहे. पुढे जाऊन खेड – शिवापूर टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाचा लोड तपासला जाणार आहे. वाहन क्षमतेपेक्षा अधिक वजन आढळल्यास त्वरित दंड आकारला जाईल आणि ओव्हरलोडेड वाहनांना तो भार कमी करणे बंधनकारक राहील. टोलनाक्यावरच दंड वसुलीची प्रक्रिया पूर्ण होईल, म्हणजेच नियम उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही.

हेही वाचा: Ladki Bahin Yojna : eKYC करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावाधाव! उरला फक्त एकच दिवस

नवले पूलावरील अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. येथे अवजड वाहनांच्या क्षमतेची तपासणी, ड्रिंक अँड ड्राईव्ह चाचण्या आणि वाहनतपासणी अशा विविध स्तरांवर नियंत्रण यंत्रणा सक्रिय राहील. तसेच प्रत्येक 100 मीटरवर सूचना फलक बसवून चालकांना सावधगिरीची सूचना दिली जाईल.

या कठोर उपाययोजनांमुळे नवले पूलावरील अपघातांची मालिका थांबेल का, हा आता सर्वांचा प्रश्न आहे. परंतु स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच महत्वाचे आणि आवश्यक आहे. वाहतुकीतील जबाबदारी, जागरूकता आणि नियमांचे पालन या तीनच गोष्टी नवले पुलाचा हा मृत्यूचा सापळा भविष्यात सुरक्षित मार्गामध्ये बदलू शकतात.

हेही वाचा:  Palghar BJP Politics: आधी आरोप मग पक्ष प्रवेश! पालघर साधू हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपात

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number