नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव प्रभाकर कांबळेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणाची सुनावणीला सुरुवात झाली असून आरोपीला आरोपीला अपहरण, अत्याचार, हत्या आणि पोक्सो अंतर्गत शिक्षा करण्यात येणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
1 मेला पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे झालेल्या संतापजनक घटना घडली. ज्या निकालाची वाट गेल्या महिनाभरापासून पाहिली जात होती त्या नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज अंतिम निकाल आहे. गुरुवारी 25 जून रोजी या प्रकरणी फास्ट्रॅकवर खटला चालवण्यात आला असून या खटल्याचा निकाल आज 29 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, कोर्टात दोन्ही बाजूनच्या वकिलांनी युक्तिवाद केला असून कोर्टात नराधम दोषी असल्याचे सिद्ध झाले आहेत. याप्रकरणी कोर्टाने निर्णय राखून ठेवला असून नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंड मिळणार की जन्मठेप? असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे उभ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळेला विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मागणी केली आहे. नसरापूर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
याचपार्श्वभूमिवर पुण्यातील सत्र न्यायालयाबाहेर “नसरापूरच्या त्या निष्पाप जीवाची किंकाळी अजूनही न्याय मागत आहे,” असा मजकूर असलेले पोस्टर झळकावत संतप्त नागरिकांकडून न्यायालयाबाहेर निषेध केला जात आहे. त्याचबरोबर शिवाजीनगर न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65) याला अटक करण्यात आली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आहेत.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरण : घटनाक्रम
१ मे २०२६ (संध्याकाळ) – नसरापूर परिसरातून साडेतीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. काही वेळानंतर मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर हत्या झाल्याचा संशय.
२ मे २०२६- पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले.
मे २०२६ चा पहिला आठवडा – शवविच्छेदन आणि न्यायवैद्यकीय
तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. तपासात घटनास्थळावरील नमुने, कपडे आणि इतर भौतिक पुरावे जप्त करण्यात आले.
याच काळात – नसरापूर, भोर आणि परिसरात नागरिकांनी निषेध आंदोलने केली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
तपासादरम्यान – पोलिसांनी आरोपीची घटनास्थळी नेऊन गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, ‘डीएनए’, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आले.
१६ मे २०२६ – अवघ्या सुमारे १५ दिवसांत तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात सुमारे १ हजार २०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
२८ मे – न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली.
जून २०२६ – सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली.
२० जून २०२६च्या सुमारास – दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद सुरू
झाले. सरकार पक्षाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली.
२५ जून २०२६ – न्यायालयाकडून निकाल जाहीर होण्याचे नियोजन करण्यात आले.