केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशातील जगण्यायोग्य आणि राहण्यासयोग्य असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पुण्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मात्र, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला पहिल्या ५० शहरांच्या यादीत स्थान मिळू शकलेलं नाही. महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश जगण्यायोग्य असलेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. पुणे, नवी मुंबई आणि मुंबईनं पहिले तीन क्रमांक पटकावल्यावर या यादीत ठाण्यानं सहावा क्रमांक मिळवला आहे.
या यादीत दिल्लीला ६५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कोलकाताने या सर्व्हेक्षणात भागच घेतला नव्हता. त्यामुळे कोलकाताचा या यादीत समावेश करण्यात आला नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं.