पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशनचं काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील स्टेशन भूमिगत असेल. वनाज ते रामवाडी मार्गावरील स्टेशन ओव्हरहेड म्हणजेच जमिनीवर असणार आहे. इंटरचेंज स्टेशनबरोबरच मेट्रोच्या विस्तारित मार्गावरील चाचणी देखील पूर्ण झाली आहे. गरवारे कॉलेज ते रुबी हॉस्पिटल तसेच फुगेवाडी ते सिविल कोर्ट या विस्तारित मार्गाचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली ३३.१ मीटर असून हे भारतातील सर्वाधिक खोलीचे मेट्रो स्थानक आहे. या भूमिगत स्थानकाचे आजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत ९५ फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली असून असे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक आहे.
सिव्हिल कोर्ट ते हिंजेवाडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक हे मेट्रो झाल्याचे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल. या विस्तारित मार्गाचे १ ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असून, स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्कलेटर प्रवाशांसाठी बसविण्यात आले आहेत.
पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) अशा दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर ११.१७ एकर असून या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण ७ दरवाजे लावण्यात येणार आहेत. या स्थानकात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून ‘ड्रॉप अँड गो’ साठी एक स्पेशल लेन असा आहे
या स्थानकात मोठ्याप्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून ‘ड्रॉप अँड गो’ साठी एक स्पेशल लेन असणार आहे. मल्टी मोडल इंटिग्रेशन साठी पीएमपीएमएल चा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप अत्यंत आकर्षक असे करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजी, विविध झाडे, हरित पट्टे,आकर्षक झाडी मोठ्याप्रमाणावर लावण्यात येणार आहे.