आरक्षणामुळे ब्राह्मणांची मुले शिक्षणासाठी परदेशात- पुण्याच्या महापौरबाईंचं धक्कादायक विधान

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   ब्राह्मण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केले.   चित्तपावन ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित श्री परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसेच […]

आरक्षणामुळे ब्राह्मणांची मुले शिक्षणासाठी परदेशात- पुण्याच्या महापौरबाईंचं धक्कादायक विधान

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

ब्राह्मण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केले.

 

चित्तपावन ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित श्री परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसेच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं.

 

ब्राह्मण समाज वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरला आहे. या समाजाने एक होणे ही काळाची गरज असून अंतर्गत भेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित यावे तसेच रोटी बेटी व्यवहार सुरू करावेत असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number