देहूरोड येथे आज पासून कत्तलखाना खुला !

 जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   देहूरोड कंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शीतळा नगर येथील मागील सात वर्षांपासून बंद असलेला कत्तलखाना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज पासून खुला करण्याचे आदेश पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी दिले आहेत. हा कत्तलखाना सुरु करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अनेक प्रयत्नानंतर कत्तलखाना सुरु झाला आहे रमेशन यांच्या पाठपुराव्यास यश आल्याने […]

देहूरोड येथे आज पासून कत्तलखाना खुला !

 जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

देहूरोड कंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील शीतळा नगर येथील मागील सात वर्षांपासून बंद असलेला कत्तलखाना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज पासून खुला करण्याचे आदेश पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी दिले आहेत. हा कत्तलखाना सुरु करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अनेक प्रयत्नानंतर कत्तलखाना सुरु झाला आहे रमेशन यांच्या पाठपुराव्यास यश आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

 

कत्तलखाना बंद असल्याने परिसरातील नागरिकांना बाहेरून मांस आणावे होते. जनावरांची अवैध कत्तलही या भागात होऊ लागली. कत्तलखाना सुरु करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी जिल्हा पशुसंवर्धन खात्याकडे चौकशी केली असता पशुसंवर्धन खात्याने ‘अपेडा’ची म्हणजेच कृषी, अन्न प्रक्रिया आणि निर्यात विकास प्राधिकरण संमती आणण्यासाठी सांगितले. अपेडाकडे माहिती अधिकाराअंतर्गत मान्यतेबाबत विचारणा केली असता अपेडाच्या संमतीची गरज नसल्याचे समोर आले.

 

देहूरोड कंटोन्मेंट बोर्ड,  कृषी, अन्न प्रक्रिया आणिनिर्यात विकास प्राधिकरण आणि जिल्हा पशुसंवर्धन खात्याकडे वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देहूरोड कटक मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या पशुवधगृहाचा अतिरिक्त कार्यभार तळेगाव दाभाडे येथील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत देण्यात आला आहे.

 

कत्तलखान्यात दररोज पंधरा जनावरे कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. कत्तलखान्यातील मांस विकण्यासाठी शीतलानार येथील सी. अब्दुल सत्तार यांचे दुकान क्रमांक एक आणि बाबुलाल सौदागर यांचे दुकान क्रमांक दोन अशी दोन दुकाने सुरु करण्याची परवानगी देहूरोड कंटोन्मेंट बोर्डाकडून देण्यात आली आहे. देहूरोड आणि आसपासच्या परिसरात कत्तलखाना नसल्याने हा कत्तलखाना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीसाठी सुरु करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number