कारागृहात कैद्यानेच केली दुसऱ्या कैद्याची दगडाने ठेचून हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   येरवडा कारागृहातच एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   दोन्ही कैदी स्वयंपाकघरात काम करत असताना क्षुल्लक कारणावरुन त्यांचा वाद झाला. त्या वादाचं रुपांतर मारामारीत झालं आणि भान हरपलेल्या कैद्यानं दगडाने ठेचून दुसऱ्या कैद्याला जीवे मारलं.   दिनेश दबडे असं त्या मारेकऱ्याचं नाव आहे. दिनेश जन्मठेपेच्या आरोपाखाली […]

कारागृहात कैद्यानेच केली दुसऱ्या कैद्याची दगडाने ठेचून हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

येरवडा कारागृहातच एका कैद्यानं दुसऱ्या कैद्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

दोन्ही कैदी स्वयंपाकघरात काम करत असताना क्षुल्लक कारणावरुन त्यांचा वाद झाला. त्या वादाचं रुपांतर मारामारीत झालं आणि भान हरपलेल्या कैद्यानं दगडाने ठेचून दुसऱ्या कैद्याला

जीवे मारलं.

 

दिनेश दबडे असं त्या मारेकऱ्याचं नाव आहे. दिनेश जन्मठेपेच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होता. दरम्यान पोलिसांनी सध्या दिनेशला ताब्यात घेतले.

 

जेलमध्ये असलेल्या कैद्यांवर कोणाचही नियंत्रण नसल्याचं या घटनेतून दिसून येत आहेत.

 

 

तुरुंगात असलेले आरोपीही अशाप्रकारे गुन्हे करत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number