पुण्यातील आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? हायकोर्टाचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई हायकोर्टानं मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड जवळील गहुंजे स्टेडियमवर होणा-या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? असा सवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला विचारला होता. यावर सुनावणी असून एमसीएला यावर उत्तर द्यायचे आहे. तामिळनाडूत कावेरी पाणी वाटपावरुन वाद सुरु आहे. त्याठिकाणी असणारे सर्व सामने रद्द करुन ते पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर भरवण्याचा निर्णय घेण्यात […]

पुण्यातील आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? हायकोर्टाचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई हायकोर्टानं मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड जवळील गहुंजे स्टेडियमवर होणा-या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? असा सवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला विचारला होता. यावर सुनावणी असून एमसीएला यावर उत्तर द्यायचे आहे. तामिळनाडूत कावेरी पाणी वाटपावरुन वाद सुरु आहे. त्याठिकाणी असणारे सर्व सामने रद्द करुन ते पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्रात होणा-या आयपीएल सामन्यांसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला विरोध करत हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र असोसिएशनला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number