Pune News: पुण्यात देशी दारू केंद्रावर पुणे पोलिसांचा मोठा छापा; एक कोटींहून अधिक रक्कम जप्त, दोघांना अटक

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आयकर विभागाकडून पैशांच्या स्रोताचा तपास सुरू आहे.

Pune News: पुण्यात देशी दारू केंद्रावर पुणे पोलिसांचा मोठा छापा; एक कोटींहून अधिक रक्कम जप्त, दोघांना अटक

पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Eve) संपूर्ण पुणे शहर सज्ज होत असताना, बेकायदा कृत्य करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी वचक निर्माण केला आहे. कोंढवा येथील काकडे वस्ती परिसरात असलेल्या एका अवैध देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर कोंढवा पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना केवळ दारूच नाही, तर कपाटात साठवून ठेवलेले 1 कोटी 3 लाख रुपयांचे घबाड सापडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांना काकडे वस्तीतील एका छोट्या खोलीत अवैध दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तिथे छापा टाकला.

सुरुवातीला पोलिसांना तिथे 3.47 लाख रुपये किमतीचा देशी आणि विदेशी दारूचा साठा आढळला. मात्र, संशय बळावल्याने जेव्हा घरातील कपाटाची झडती घेण्यात आली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. कपाट नोटांच्या पुडक्यांनी पूर्णपणे भरलेले होते.

हेही वाचा: Ajit Pawar: पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप; अजित पवार, रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्या भेटीचा ‘इनसाईड रिपोर्ट’

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेतले असून, एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जप्त केलेली ही अवाढव्य रक्कम बेकायदा दारू विक्रीतूनच जमा केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही रोकड मोजण्यासाठी पोलिसांना बराच वेळ लागला. जप्त केलेल्या रकमेची माहिती पोलिसांनी तातडीने आयकर विभागाला (Income Tax Department) दिली असून, आता या पैशांच्या स्त्रोताचा सखोल तपास केला जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. “अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे,” असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ऐन थर्टी फर्स्टच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: Bangladesh Violence: बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंदू युवकाची जमावाकडून हत्या; 7 दिवसांत दुसरी धक्कादायक घटना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number