पुण्यातील टेकड्यांवर फिरवला जातोय ‘बुलडोझर’ ; नागरिकांचा संताप

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे टेकड्या म्हणजे पुणेकरांसाठी मोकळा श्वास घेण्याचं हक्काचं ठिकाण. पण आता याच टेकड्या सर्रास पोखरल्या जाताहेत. आणि टेकड्या पोखरणाऱ्या विकासकांविरूद्ध कोणी तक्रार केल्यास महापालिकेकडून केवळ वरवरची कारवाई केली जातेय, असं स्थानिकांचं म्हणणंय. पुण्यातील कोथरूड,वारजे,वडगाव,कात्रज,बावधन,बाणेर या ठिकाणच्या टेकड्या पोखरण्याचं काम चालू आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने जर वेळीच कठोर कारवाई केली नाही तर […]

पुण्यातील टेकड्यांवर फिरवला जातोय ‘बुलडोझर’ ; नागरिकांचा संताप

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

टेकड्या म्हणजे पुणेकरांसाठी मोकळा श्वास घेण्याचं हक्काचं ठिकाण. पण आता याच टेकड्या सर्रास पोखरल्या जाताहेत. आणि टेकड्या पोखरणाऱ्या विकासकांविरूद्ध कोणी तक्रार केल्यास महापालिकेकडून केवळ वरवरची कारवाई केली जातेय, असं स्थानिकांचं म्हणणंय.

पुण्यातील कोथरूड,वारजे,वडगाव,कात्रज,बावधन,बाणेर या ठिकाणच्या टेकड्या पोखरण्याचं काम चालू आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने जर वेळीच कठोर कारवाई केली नाही तर लवकरच या टेकड्या नष्ट होतील. ज्यामुळे नागरिकांचं व्यायामाचं, मोकळा श्वास घेण्याचं हक्काचं ठिकाण इतिहासजमा होईल.

त्यामुळे ह्या टेकड्या पोखरणाऱ्यांवर  प्रशासनाकडून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल असा इशाराच नागरिकांनी दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number