पुण्याच्या चार वर्षीय ईशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. दुबई येथे झालेल्या स्पर्धेत तिने हे यश मिळवले. मूळचे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार वर्ष ११ महिन्याची […]

पुण्याच्या चार वर्षीय ईशान्वीचा वर्ल्ड रेकॉर्ड

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील इशान्वी बाळासाहेब आढळराव पाटील या चिमुरडीने सर्वात जलद गतीने सर्व देशांचे झेंडे ओळखून राजधान्या पाठ करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. दुबई येथे झालेल्या स्पर्धेत तिने हे यश मिळवले. मूळचे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार वर्ष ११ महिन्याची कन्या ईशान्वी बाळासाहेब आढळराव-पाटील हिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १५ जून रोजी तिने १९५ देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ तीन मिनिटे दहा सेकंद इतक्या जलद गतीने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याद्वारे तिने जागतिक विक्रमला गवसणी घातली आहे. एक नव्हे तर तब्बल तीन विक्रमांना तिने गवसणी घातली आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number