PUNE CRIME BRANCH: पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत ठार

पोलिसांनी प्रतिउत्तर म्हणून केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख हा मृत झाला. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी आणि पत्नीने पोलिसांवरच हत्येचा आरोप केला आहे.

PUNE CRIME BRANCH: पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत ठार

रवी ढोबळे. प्रतिनिधी. सोलापूर: मोका गुन्ह्यातील फरार आरोपी मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे एका नातेवाईकाच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पुणे क्राईम ब्रँच आणि मोहोळ पोलिसांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लांबोटी येथील चंदननगर येथे सापळा रचला. फरार आरोपी शाहरुखने पोलिसांवर फायरिंग करू लागला. यानंतर, पोलिसांनी प्रतिउत्तर म्हणून केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख हा मृत झाला. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी आणि पत्नीने पोलिसांवरच हत्येचा आरोप केला आहे.

पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (रा. गल्ली नंबर 23 / ए, सय्यद नगर, हडपसर, पुणे) आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून शाहरुख शेखवर सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. मोकाच्या गुन्ह्यात शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा फरार होता. पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाला शाहरुख शेख लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती. 

हेही वाचा: GHOD DAM PUNE: शिरूरमधील घोड धरण ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर

या माहितीच्या आधारे, पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाने मोहोळ पोलिसांच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शाहरुख शेखला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबविली होती. यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसताच शाहरुखने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रतिउत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला.

'हे एन्काउंटर नव्हते, तर पोलिसांनी शाहरुख शेखला झोपेत असताना गोळ्या घालून ठार मारले. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे आणि आम्हाला न्याय द्यावा', अशी मागणी मृत शाहरुखचे वडील रहीम शेख आणि पत्नी नफीसा शेख यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number