पुणे, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गोवंशातील जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आला. यानंतर संक्रामक आणि सांसर्गिक रोगास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपूर्ण पुणे जिल्हा लम्पी चर्मरोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्याचे आदेश जारी केले आहेत. काही जनावरांचे लम्पी रोग नमुने सहआयुक्त पशुसंवर्धन विभाग आणि रोग अन्वेषण विभाग, औंध यांच्या अहवालानुसार सकारात्मक आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी करत उपाययोजना नमूद केल्या आहेत.