जय महाराष्ट्र न्यूज, पूणे
ब्राह्मण महासंघानं दादोजी कोंडदेव यांची प्रतिमेवरुन आज बुधवारी मोठा वाद निर्णाण झाला होता. ब्राह्मण महासंघानं पुणे महापालिकेत दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा लावली होती. दादोजी कोंडदेव यांच्या प्रतीमेच पूजन केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे.
त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत येऊन गोंधळ केला. दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा विना परवानगी लावल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचा होता.
सकाळी ब्राह्मण महासंघाने दादोजी कोंडदेव याची प्रतिमा बसवली यानंतर तासाभरातच त्यांनी प्रतिमा हलवली देखील. आनंद दवे यांनी परवानगी न घेता प्रतिमा कशी बसवली याप्रकरणी महापौर यांनी खुलासा करावा आणि ब्राम्हण महासंघावर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड ने केली आहे.
यासर्व घडामोडींवरून आता नवीव वादाला सुरूवात झाली आहे.