सध्या पुण्यात गुन्हेगारीच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच पुन्हा एकदा पुण्याच रक्तरंजित खूनाचे सूत्र सुरू झाले. पुणे शहरात आंदेकर-कोमकर टोळी संघर्ष पुन्हा पेटल्याचं चित्र समोर आलं आहे. बिबवेवाडीतील बालाजीनगर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबारात अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा भाऊ असलेल्या म्हस्केच्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
2024 मध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या या टोळीयुद्धात आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. पोलिसांनी परिसर सील करत मोठा बंदोबस्त तैनात केला असून 6 जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. वनराज आंदेकर खूनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने अक्षय म्हस्केला मारण्याचा कट रचला.
सहकारनगर पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, रामजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्यासह आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.