Pune Crime: ‘शिक्षणाचे माहेरघर’ अशी ओळख असणाऱ्या पुण्यात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटना अधिक, अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

अशातच आता नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) चा 2024 चा अहवाल समोर आला आहे. 

Pune Crime: ‘शिक्षणाचे माहेरघर’ अशी ओळख असणाऱ्या पुण्यात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटना अधिक,  अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

सध्या राज्यातीलल महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत पुणे शहरातून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. नसरापूरमधील चिमुरडी असो वा चाकणमधील 11 वर्षाची मुलगी कोणीही सध्या सुरक्षित नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. अशातच आता नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) चा 2024 चा अहवाल समोर आला आहे. 

समोर आलेल्या अहवालानुसार, , महिला आणि मुलांविषयक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत पुणे शहर देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. या आकडेवारीमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  अहवालानुसार, 2024 या वर्षात पुण्यात महिला आणि मुलांविषयक लैंगिक अत्याचाराचे तब्बल 244 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. देशातील 19 प्रमुख महानगरांच्या तुलनेत ही संख्या चिंताजनक मानली जात आहे. दिल्ली, जयपूर, मुंबई आणि हैदराबाद या शहरांनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. 

त्याचप्रमाणे महानगरनिहाय आकडेवारी पाहिली असता, दिल्ली शहरात सर्वाधिक 1,089 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर जयपूरमध्ये 497, मुंबईत 411, हैदराबादमध्ये 358 तर पुण्यात 244  गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशातील 19 महानगरांमध्ये महिला अत्याचाराच्या एकूण 50  हजार 584 घटना नोंदवण्यात आल्याची माहितीही अहवालात देण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. महिला हेल्पलाइन, पेट्रोलिंग, सायबर मॉनिटरिंग आणि जनजागृती मोहिमा सुरू असल्या तरी गुन्ह्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number