पुणे : बीड जिल्ह्यातील दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप करत आरोपी पुण्यातच लपले असल्याचे सांगितले होते. त्याचा हा आरोप आता खरा ठरला असून या हत्या प्रकऱणातील अन्य आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.
हेही वाचा : बीड हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात
देशमुख हत्येचे पुणे कनेक्शन
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २५ दिवसांनी मुख्य आरोपींना अटक झाली. या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर वाल्मिक कराडला शोधण्यासाठी विविध ठिकाणी पथकं गेली होती, मात्र, पोलिसांच्या विशेष पथकांना वाल्मिक कराडला शोधण्यात अपयश आले. सीआयडीच्या तीन पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेला वाल्मिक कराड देखील पुण्यात शरण आला. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पुण्यातील बालेवाडीतून अटक करण्यात आली. आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपी पुण्यात सापडत असल्याने देशमुख हत्या आणि पुणे यातील कनेक्शन पोलीस शोधताहेत.देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपी पुण्यात लपल्याचा संशय व्यक्त केला होता. धनंजय देशमुख यांच्या संशयात तथ्य असल्याचे आता समोर येतं आहे. पोलिसांच्या तपासाची यंत्रणा पुण्याभोवती कार्यरत
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
गुन्हेगारांना अभय कोणाचे?
घटना घडण्याआधी आणि घटनेनंतर मदत केली त्याचा तपास सुरू
आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे कृत्य केल्याचा दावा
या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत
आरोपी महाराष्ट्रात २५ दिवस लपून राहतात कसे?
आरोपी लपून राहतात याचा अर्थ ते सर्वसामान्य नाहीत
आरोपींना पुण्यात आश्रय देणारा कोण?
त्याचाही पोलिसांकडून तपास होणं आवश्यक
हत्येची घटना क्रुरता नसून विकृती असल्याचा आरोप
अशा विकृतीचा समूळ नायनाट करण्याची कुटुंबीयांचा मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासाला गती आली असली तरी हत्येचे मूळ कारण आणि आरोपी अद्यापही मोकळे असल्याचा आरोप देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार आहे. पण त्यासाठी पोलीस या घटनेतील सर्व आरोपींपर्यंत जलदगतीनं पोहोचणं आवश्यक आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणेला कोठडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.