जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्यावर 4 हजार 583 मतांनी मात केली. तर, हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली. हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी विजय मिळवला.
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानं रिक्त झालेल्या या जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते.