आपण कोणत्याही सुंदर ठिकाणी गेलो की आपल्याला तेथील मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचे असते मात्र या मोहात आपल्याला कोणतेच भान राहत नाही आणि या नादात आपण आपला जीव धोक्यात घालतो. असाच एक प्रकार पुण्यातील या तरुणासोबत घडला आहे.
तुषार दळवी असं या पुण्याच्या तरुणाचं नाव आहे, सिंहगड किल्ल्याच्या तटबंदीवर सेल्फी काढण्याचा मोह तुषारला आवरला नाही आणि सेल्फीच्या नादात तुषार 300 फूट खोल दरीत कोसळला, मात्र सुदैवानं तो एका झाडावर अडकल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
स्थानिक सिंहगड वनसंरक्षण समितीच्या तसेच वनखात्याच्या सुरक्षा रक्षकांनी तुषारला दरीतून बाहेर काढले.
या अपघातामुळे तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तुषार आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सिंहगडाची सफर करण्यासाठी गेला होता, त्यावेळी ही घटना घडली.