जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असली तरी पालकमंत्री गिरीश बापट आणि सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यातील गटबाजी पुन्हा उघड झालीय.
खासदार काकडे यांनी आज जवळपास 40 नाराज नगसेवकांची बैठक घेतली. प्रशासनाकडून आमचीच कामं अडविली जात असून पक्षाचा कोणताही पदाधिकारी मदत करत नाही, असा सूर या बैठकीत नगसेवकांनी लावल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय.
तर, दुसरीकडे शहाराध्यक्ष योगेश गोगावले यांनी अशा समांतर बैठका कोणी घेत असेल तर त्यांना पक्ष समजला नाही, असा टोला काकडे यांना लगावलाय.