जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुण्यात सुट्टी संपवून कामावर गेलेल्या 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय अश्विनी गवारे ने काम करत असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.
अश्विनी मुंढव्यातील ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस होती. मागील काही दिवसांपासून अश्विनी रजेवर होती. सोमवारी सकाळी ती कामावर हजर झाल्यानंतर काही वेळात त्याच इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि खाली उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.