महाडमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

गेले बरेच दिवस सुरु असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सर्वत्र चांगलाच वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. याविषयी अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्य मांडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बारसूला भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी काही महत्वाची विधान केली असून महाड येथील जाहीर सभेत ते बारसू आंदोलनावर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेले बरेच दिवस बारसू प्रकरण चांगलेच […]

महाडमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

गेले बरेच दिवस सुरु असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन सर्वत्र चांगलाच वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. याविषयी अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्य मांडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी बारसूला भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी काही महत्वाची विधान केली असून महाड येथील जाहीर सभेत
ते बारसू आंदोलनावर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेले बरेच दिवस बारसू प्रकरण चांगलेच पेटले आहे. याच पार्श्ववभूमीवर ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे ६ मार्च रोजी बारसूच्या दौऱ्यावर गेले असून प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बारसूतील कातळशिल्पांची पाहणी केली. तसेच ‘बारसूतील कातळशिल्प प्रकल्पात जाऊ देणार नाही’ असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. तर या जागेच्या मातीची चाचपणी केल्यास गुन्हे दाखल करू असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

प्रसार माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
या कातळशिल्पाला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव युनेस्कोकडे दिलेला आहे. ही सुद्धा जागा या वादग्रस्त रिफायनरीमध्ये येते, हे मला हल्ली कळलं. या पठारावरील अनेक अशी कातळशिल्पे आहेत, जी ऐतिहासिक किंवा अश्मयुगीन काळातील असावीत. ज्याप्रमाणे त्यावेळी रिफायनरीसाठी पत्र लिहिले होते. त्याप्रमाणे जागतिक वारसासाठी पत्र लिहिणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, बारसूतील कातळशिल्पांची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे आता महाड येथील जाहीर सभेत बारसू आंदोलनावर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. महाडच्या जाहीर सभेत ते नेमकं काय बोलतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number